करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी:- आज च्या धकाधुकी च्या जीवनात भारतीय नागरिकाला आरोग्य जोपासण्यासाठी वेळ नाही, तो आपल्या भारताची संस्कृती विसरत पाश्चात्य देशाच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहे.त्यामुळे ते आपले जीवन अधीकच घातक करत आहेत. आज मनोरंजन च्या नावाखाली गाव दणाणून सोडणार्या ‘डीजे’च्या कर्णकर्कश्श आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींच्या जीवाची घालमेल होत आहे.

पाश्चात्य संस्कृती असलेल्या ‘डीजे’ मुळे पारंपरिक लोककला लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सनई-चौघडा, नगारा, तुतारी, लेजीम, ढोल, ताशा, झांज आदी पारंपरिक वाद्य लुप्त होऊ लागली आहेत.या पार्शवभूमी वर बिटरगाव ठाणेदार यांनी आगामी सण उत्सव निमित्त ढाणकी पोलीस चौकी येथे शांतता मिटींग आयोजित करत गावातील जेष्ठ नागरिक, शांतता कमेटी सदस्य,

समाजसेवक, तरुण वर्ग आणि गावातील पत्रकार यांना आमंत्रीत करत ते शांतता मिटींग मध्ये लोकांना संबोधित करताना म्हणत होते की,भारतीय संस्कृतीमध्ये राहणीमान हे विविधतेने भरलेले, परंपरा जपणारे, शांततेने एकत्र राहणारे, आणि धार्मिक सहिष्णुतेचे आहे.

आपण ज्या भारतात राहतो त्यात अनेक धार्मिक लोक त्यांच्या स्वतःच्या भिन्न संस्कृतीसह शांततेने एकत्र राहतात. प्रत्येक धर्मात सांगितले आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये मंग आपण आपल्या धर्मा प्रमाणे वागतो का?
असे ते म्हणत असताना आपण मोठ मोठया आवाजाचे डी. जे लावून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना त्रास देत आहोत की नाही,असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आव्हान केले की, आपण आपले सगळे येणारे आगामी सण उत्सव आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करून विविधतेने भरलेले, परंपरा जपणाऱ्या देशात शांततेने एकत्र रहाण्यासाठी पाश्चात्य संस्कृती असलेल्या ‘डीजे’ला हाकलून लावू.
चौकट :- आपली पारंपरिक संस्कृती जोपासण्यासाठी आपल्याला पाश्चात्य संस्कृती सोडून द्यावी लागेल. त्या साठी मी ठाणेदार भगत साहेब यांच्या संकल्पनेचे स्वागत करून येणाऱ्या राम नवमी जयंती ला डी. जे. सारख्या घातक हत्याराला फेकून भारतीय पारंपरिक संस्कृतीनुसार राम नवमी शोभा यात्रा काढण्याचे वचन देतो. – रोहित वर्मा
(महामंत्री भाजयुमो, पुसद जिल्हा)1



