✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड आणि ताजपुरा वार्ड येथील ताज मशिदीसमोरील, बौद्ध स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत डीपी (DP) बसवण्याच्या कामाला दोन्ही वार्डातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवल आहे.

•जीवितहानीची भीती- बौद्ध स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या अरुंद आणि खराब रस्त्यावरून अंत्ययात्रा आणि शववाहिका रथ जात असतात. येथे डीपी बसवल्यास भविष्यात मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.

•प्रशासनाचा हेकेखोरपणा:- नागरिकांचा वाढता जनआक्रोश लक्षात न घेता, संबंधित उपअभियंता कोणाचेही ऐकण्यास तयार नसून नियोजित जागेवरच डीपी बसवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

•नागरिकांची मागणी:- रस्ता मोकळा व सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी बसवण्यात येत असलेली डीपी तात्काळ हटवून ती दुसऱ्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.








