✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर) मो.9823995466
उमरखेड – 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे सर्व भारतभर स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे बाळदी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमती मंजुळाबाई मारोतराव रावते माध्यमिक विद्यालय येथे गावातील माजी उपसरपंच साहेबराव पाटील मिराशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक नागेश महाजन यांनी सर्व जबाबदारी पार पाडून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळीचे आभार मानले.त्यानंतर तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सकाळी सात वाजताच्या सुमारे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती. तेव्हा स्वातंत्र्यदिनानिमित्त घोषणा देऊन ही प्रभात फेरी पार पाडली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोज करण्यात आला होता. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ दुर्गा जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रगीता नंतर काही शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल मुलांना मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले त्यांच्या वेशभूषात काही विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.तेव्हा काही मुलांचे भाषणे झाली, सांस्कृतिक कार्यक्रमही झाले, माझं गाव कसं साक्षर होईल त्याबद्दल शाळेतील गुरुजन वर्गाकडून सर्वांना एक शपथ देण्यात आली यामधून गावामध्ये एक अनोखा संदेश गावकऱ्यांना मिळालेला दिसून आला.तसेचगावातील प्रकाश शेळके यांनी गरजू विद्यार्थ्यांना शाळेची बॅग व इतर साहित्य मान्यवराच्या हस्ते दिले त्याबद्दल त्यांचे गावभर कौतुक केले जात आहे.

त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत येथे माजी सैनिक किसन भोसकर यांच्या हस्ते ध्वजारोच करण्यात आला. तिन्ही शाळेतील सर्व शिक्षकांनी गावातील सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन शब्दसमूहाणे स्वागत केले.

यावेळी गावातील ग्रामपंचायतचे प्रशासक डॉ. भगवान बोरकर माजी सरपंच प्रदीप शिरडकर,माजी उपसरपंच साहेबराव पाटील मिराशे, ग्रामपंचायत चे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी माजी सदस्य, तसेच गावातील ग्रामअधिकारी डी.बी.सूर्यवंशी गावचे तलाठी कल्याणकर ताई, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी,अंगणवाडी सेविका मदतनीस, तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील अंकुश मिराशे,शिवगंगा खिल्लारे,केशव वटाणे, शामराव पोटे, शामराव टिपरे, ज्ञानेश्वर वानखेडे, पांडुरंग वटाणे, अनिल भोसले, गोविंद बोंद्रे,गणपत ठोके, राजू भोसले, किशोर दुधे,निर्गुण मिराशे, विशाल भोसले,विनोद टिपरे, अमोल टिपरे,रत्नाकर धुळे, दिलीप चीरडे,दत्ता जोगदंड,प्रवीण इंगळे,अतिश वटाणे, दिगंबर वानखेडे, पांडुरंग राठोड, बापूराव दुधे,भाऊराव वटाणे, व इतर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







