🚨महागाव येथील गंभीर स्वरूपाच्या खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
यवतमाळ- तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावणारे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल जयसिंग राठोड यांच्या उल्लेखनीय कामगिरीची जिल्हा पोलिसांनी दखल घेतली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी यवतमाळचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते त्यांना सन्मान प्रदान करण्यात आला.

दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी खंडाळा हद्दीतील जंगल परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटलेली नसतानाही घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, उपलब्ध माहिती आणि तपासाच्या विविध बाजूंचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांनी विविध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. अखेर या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणात एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात पीएसआय अमोल राठोड यांनी दाखविलेली दक्षता, चिकाटी, तत्परता आणि तपासकौशल्य याची जिल्हा पोलिसांकडून विशेष दखल घेण्यात आली. आज मिळालेला प्रशस्तिपत्राचा सन्मान मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो. त्यांच्या संस्कारांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची जिद्द यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.








