
🚨 (महायुतीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार)
✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड येथे महायुतीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष, दलित पँथरचे नेते रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य सत्कार व दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने नामदार रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनरावजी वानखेडे, भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ-वाशिम जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, माजी आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, शिवसेना नेते चिंतांगराव कदम सर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू जाधव, शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण पाटील मिराशे,रिपाई चे पंकज इंगोले रिपाईचे अनिल धोंगडे तसेच रिपाई महागावचे गौतम रणवीर यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सिद्धार्थ बरडे यांनी केले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदास आठवले साहेब यांनी उमरखेड तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच संगम चिंचोली पुनर्वसनासह विविध सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.दशकभराच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल नामदार रामदास आठवले यांचा करण्यात आलेला हा सत्कार सोहळा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.








