✍🏻सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466



उमरखेड : – अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करीत बुधवारी, दि. १२ ऑगस्ट रोजी 59 जातीतील आंबेडकरी अनुयायी हजारोंचा महामोर्चा उमरखेड उपविभागिय अधिकारी कार्यालयावर धडकला. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवून माजी न्यायमूर्ती बदर समिती रद्द करा! या प्रमुख मागणीसाठी उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, उमरखेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चात बौद्ध समाजबांधवांसह आंबेडकरी विचारांचे समर्थक, महिला, पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हा महामोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून निघाला व शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी तसेच न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. अनुसूचित जातींमधील ५९ जातींच्या आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर मोर्चेकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी दादासाहेब शेळकेराष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, मातंग समाजाच्या नेत्यांनी मातंगाच्या हातातील डफडे व पुंग्या फोडा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रस्ता दाखवा. हे आंदोलन मातंग समाजाच्या विरोधात नसून दोन समाजांमध्ये भांडण लावणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात आहे, असे स्पष्ट केले. मातंग समाजाबद्दल आदर असून, सामाजिक सलोखा कायम ठेवत हा लढा संविधानिक हक्कांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला नाही तर उमरखेड ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अनुसूचित जातींमधील सर्व ५९ जातींना आरक्षण देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव केला होता का ? असा खडा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी मोर्चाला संबोधित करतांना माधव जमदाडे ,राजेश्वर पालमकर ,मनीष कावळे, माधव वाढवे देवानंद पाईकराव मिलिंद धुळे आदि वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला व आगामी काळात मतपेटीच्या माध्यमातून सरकारला उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला.

या महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी देवानंद पाईकराव, जॉन्टी विनकरे, अरविंद धोंगडे, शामभाऊ धुळे, बबलू भालेराव, सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, मिलिंद धुळे, शुद्धोधन दिवेकर, गौतम नवसागरे,अरविंद धोंगडे बबलू भालेराव, प्रसेनजीत दिवेकर, नागेश पाटील, सचिन वाहुळ, मनोज धुळध्वज, कैलास कदम, तुषार धुळे, मिलिंद नवसागरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र एक करून परिश्रम घेतले. यावेळी समता सैनिक दल यांनी चांगल्या प्रकारे फक्त पद्धतीने बंदोबस्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ दिवेकर यांनी सूत्रसंचालन जॉन्टी विनकरे तर आभार अरविंद धोंगडे यांनी मानले.







