
🚨(हजारोंच्या जनसमुदायाने या मोर्चा सहभागी व्हावं असे आव्हान आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने केली आहे.)
उमरखेड- येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात दिनांक 12 ऑगस्ट रोजी ठीक बारा वाजता महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.सदर मोर्चा हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मधील 59 जातीच्या वतीने संयुक्त मोर्चाचे आयोजन आंबेडकरी अनुयायांनी केले आहे.

या मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव व आंबेडकरी हितचिंतक महिला पुरुष युवक युवती या मोर्चात मोठ्या संख्येने सामील होणारा असून हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड च्या प्रांगणात समस्त बांधवांचा जमाव होणार आहे. हा जमाव माहेश्वरी चौक, शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयाकडे धडकणार आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करा न्यायमूर्ती अनंत बदर समिती अहवाल त्वरित सार्वजनिक करावा शासकीय नोकरीतील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरावा.पदोन्नतीतिल आरक्षण त्वरित लागू करावे जातीनिहाय जनगणना करावी एससी,एसटी,ओबीसी यांना क्रिमीलियर ची अट लावू नये ,नीट सीबीएससी घोटाळ्याची चौकशी व दोषीवर कठोर कारवाई करावी या मागण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. सदर मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती उप वर्गीकरण कृती समिती उमरखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

सदर मोर्चेकरिता गावोगावी जाऊन हँडबिल व गावोगावात कॉर्नर बैठका घेण्यात येत असून जनतेकडून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे.






