🚨(समस्त संविधान प्रेमी, आंबेडकरवादी सर्व सामाजिक राजकीय संघटने च्यावतीने धरणे आंदोलन चे आयोजन)

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466
उमरखेड (दिनांक 24 जुलै) आंबेडकरवादी सामाजिक व राजकीय संघटनेतर्फे निट पेपरफुटी मुळे जंतर-मंतर दिल्ली येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांनी एक मोठं जनआंदोलन उभा केलं त्या जन आंदोलनाला संपूर्ण भारतातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, नीट पेपर फुटी मुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून स्वतःच जिवन संपवलं सरकारी नोकरी कुठेही संधी नाही, सगळीकडे खाजगीकरण, बेरोजगारीने ऊथांग माजवले आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या रोषाच रूपांतर जन आंदोलनात झालं जंतर मंतर दिल्ली येथे गेल्या महिन्याभरापासून संविधानिक मार्गाने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

असे असतांना दिल्ली पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन मोडीत काढण्यासाठी शांततापूर्ण आंदोलनावर अमानुष लाठिचार्ज करून शेकडो विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्या अनुषंगाने खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांनी दिनांक 25/07/26 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे, त्या अनुषंगाने दिनांक 25/07/26 रोजी उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजलळ संपूर्ण आंबेडकरी सामाजिक व राजकीय संघटना धरणे आंदोलन करीत आहोत.

असे आव्हान यावेळी शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना, सिद्धार्य दिवेकर शहर अध्यक्ष भीम टायगर सेना, शूद्धोधन दिवेकर शहराध्यक्ष रिपब्लिकन सेना देवानंद पाईकराव तालुका अध्यक्ष आझाद समजा पार्टी, सचिन वाहुळे इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी केले आहे.







