✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

यवतमाळ/ महागाव दि. २२ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांनी यशस्वी सापळा कारवाई करून श्रीमती शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७ वर्षे), पर्यवेक्षिका तथा अतिरिक्त कार्यभार बाल विकास प्रकल्प अधिकारी, वर्ग-३, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महागाव, जि. यवतमाळ यांना लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर ताब्यात घेतले.तक्रारदार (वय २१ वर्षे, महिला) यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. संबंधित पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी यांनी १०,०००/- रू. लाचेची मागणी केली होती.

दि. २२.०७.२०२६ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी यांनी तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून ५,०००/- रू. व काम झाल्यानंतर उर्वरित ५,०००/- रू, असे एकूण १०,०००/- रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच दिवशी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. तक्रारदारास पंचासमक्ष आरोपी यांच्या महागाव येथील राहत्या घरी पाठविण्यात आले. आरोपी यांनी त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून प्रथम हप्ता ५,०००/- रू. स्वीकारला. त्यानंतर सापळा पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन व्हिडिओग्राफीच्या उपस्थितीत स्वयंपाकघरातील गॅस ओठ्याखालील पहिल्या कप्यात ठेवलेली ५,०००/- रू. लाच रक्कम जप्त केली.

या प्रकरणी पोलीस स्टेशन महागाव, जि. यवतमाळ येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.सदरची कारवाई ही बापु बांगर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, सचिंन्द्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांचे पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पो.हवा. अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधिर कांबळे पो.शि. आकाश सहारे, सुरज मेश्राम, सतिश सोनोने, इफाजोद्दीन काझी, मपोशी मनिषा राजुरकर, सरिता राठोड, चालक दिनेश सरोदे, अतुल नागमोते यांनी केलेली आहे.

यवतमाळ जिल्हातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसम यांच्या वतीने कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर शासकीय शुली व्यतिरिक्त लाचेची मागणी करित असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ, दगडी इमारत, टांगा चौक यवतमाळ येथे संपर्क साधवा.
तक्रारदारांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व तक्रारदार यांचे सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम ही १ महीन्याचे आत परत केल्या जाईल. तसेच तकारदारांचे शासकीय विभागात अडकलेले वैध कामही पुर्ण करुन दिले जाईल.







