✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80 वा वर्धापन दिन नागापूर रुपाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात व देश प्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7:30 वाजता करण्यात आली.

यामध्ये प्रथम भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सरपंच प्रशासक सौ सुलावती राजाराम डुकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावातील पोलीस पाटील सदानंद तोडासे, शाळा समिती अध्यक्ष सुनील खोलगडे, ग्रा सदस्य माधव चंदेवाड, मोहसीन खान पठाण(रोजगार सेवक), महमूद भाई, जावेद मौलाना, धम्मा दिवेकर, मेहबूब खान पठाण, अरुणा पतंगे,आशा सेविका कांचन राठोड, जोशना राठोड, कोतवाल पटाचारा ताई , वशिमा परविन मोहसीन खान पठाण(ग्रा. सदस्य) हे सर्व मान्यवर उपस्थित होते.








