✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड, दि. २५ मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस [एमपीजे] या सामाजिक संघटनेच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी माहिती केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा पैगंबर जयंती दिनाच्या पावन निमित्ताने दि. २६ ऑगस्ट बुधवार, रोजी दुपारी २:०० वाजता, अबरार कॉम्प्लेक्स, नाग चौक, उमरखेड येथे संपन्न होणार आहे.

एमपीजे च्या वतीने विविध क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविल्यात येतात .शिक्षण: शिक्षणाचा हक्क (RTE), शिष्यवृत्ती योजना- अन्न सुरक्षा:रेशन कार्ड, अन्न सुरक्षा योजन- आरोग्य: महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत- बांधकाम कामगारांचे अधिकार: बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजना, नोंदणी, सुरक्षा साधने- बाल संगोपन: अंगणवाडी, बाल संगोपन योजना, कुपोषण निर्मूलन . क्षावण बाळ , मतदार नोंदणी आदी सर्व योजन .- स्थानिक मुद्दे: पाणी, रस्ते, स्वच्छता, व नगरपरिषदेच्या योजना. शासनाच्या सर्व योजना: केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती व अर्ज भरण्यासाठी मदत करणे! एमपीजे ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना त्यांच्या घटनात्मक हक्क व अधिकारांबद्दल शिक्षित करण्याचे काम करत असून योजनांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे गरजू व वंचित घटकांपर्यंत पोहोचावीणे, हा या माहिती केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

या केंद्रावर कोणताही नागरिक येऊन मोफत माहिती घेऊ शकतो. असे शहराध्यक्ष मोहसीन राज म्हणाले, या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, वकील, आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.







