[चलो हदगाव! दि.२३ ऑगस्ट रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी]

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466
हदगाव (दि.२२ ऑगस्ट) पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (तालुका शाखा हदगाव) आणि भिम टायगर सेना (तालुका शाखा हदगाव, जि. नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर महाकवी डॉ. वामनदादा कर्डक यांचा १०४ वा जयंती सोहळा व कलावंतांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६वेळ: सकाळी ११.०० वाजतास्थळ: संत रोहिदास महाराज सभागृह, आठवडी बाजार, हदगाव प्रमुख उपस्थिती व उद्घाटक:कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपनगराध्यक्ष (हदगाव) सुनीलभाऊ सोनुले यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके उपस्थित राहतील. तसेच स्वागत अध्यक्ष म्हणून ब.टा.यु फोर्सचे लक्षणराव भवरे आणि विशेष उपस्थिती म्हणून हदगाव/हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर व पा.शा.लो.सं.मंडळाचे त्रित्रिलकुमार भवरे हे उपस्थित राहणार आहेत.विशेष आकर्षण व सांस्कृतिक कार्यक्रम: दुपारी १२.०० वाजता महाकवी साहित्यरत्न वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर आधारित आणि बुद्ध-भिम गीतांचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अरूणा सावते आणि संच (येहळेगाव, ता. अर्धापूर) यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित कलाकारांचे गीतगायन होणार आहे.

संयोजक व आयोजक:या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रबोधनकार भिमशाहीर माधवदादा वाढवे, तुकाराम गायकवाड आणि देवकाबाई मुलगीर हे असून, सूत्रसंचालन चंद्रमुनी मुनेश्वर व दिलीप राजा परधणे करणार आहेत.

हदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी व भीमप्रेमींनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भिम टायगर सेना व पारंपारिक शाहीर लोककलांवंत संवर्धन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







