
✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466

उमरखेड – आपली गुणवत्ता आणि विविध शालेय उपक्रमांच्या जोरावर उमरखेड शहरात नावारूपाला आलेली नगर परिषद अधिनस्त शहीद भगतसिंग शाळा क्रमांक 2 या शाळेने नगर परिषदेच्या शिरपेचात आणखीएक मानाचा तुरा रोवला आहे.नगर परिषद उमरखेड येथील शहीद भगतसिंग शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थिनी कु श्रावणी घनसरवाड हिची लांब उडी या क्रिडा प्रकारासाठी राज्यस्तरीय Athletics स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यवतमाळ येथे आज दिनांक 08 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या ज्युनियर Athletics स्पर्धेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. श्रावणी घनसरवाड हिला लांब उडी या क्रिडाप्रकारासाठी सुवर्णपदक मिळाले असून ती राज्यस्तरीय athletics स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. तर नववीचा अमन शेख आणि आठवीचा फरहान खान यांना अनुक्रमे कांस्य आणि रजत पदक मिळाले आहे.

यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, शाळेचे क्रिडा शिक्षक मुनेश्वर सर , शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड तसेच शाळेतील पूर्ण स्टाफचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.मुख्याध्यापक राठोड यांनी यशासाठी विद्यार्थी आणि क्रिडा शिक्षक यांचे कौतुक केले आहे. तसेच नगर परिषदेच्या अध्यक्षा, सौ. तेजश्रीताई जैन मॅडम, शिक्षण सभापती रसूल जी पटेल सर, शिक्षणप्रेमी नगरसेवक गणेश खंदारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे सर,प्रशासन अधिकारी नितीन चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगत सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहेत.








