✍️ राहुल पाईकराव ( तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड – नागापूर रुपाळा परिसरातील मुस्लिम समाजाच्या मोजमाप करण्यात आलेल्या दफन भूमीची जागा अधिकृतपणे आणि कायमस्वरूपी मुस्लिम समाजाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन दिवंगत उपसरपंच रेहमत खान पठाण यांनी मागणी शासनाकडे केली होती. परंतु सदर दफन भूमीच्या प्रकरणांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जि. परिषद यवतमाळ यांनी ग्रामपंचायत मासिक सभा ठरावावर स्वाक्षरीची त्रुटी आली होती.

सदर त्रुटीची पूर्तता करण्यात आली. परंतु सदर मागणी अजूनही शासनाकडे प्रलंबित आहे. मोजे नागापूर रूपाळा येथील लोकसंख्या 2200 आहे त्यापैकी मुस्लिम लोकांची लोकसंख्या 700 एवढी आहे. सदर गावात मुस्लिम समाजाला दफनभूमी साठी मोजे आ्बवन(उ) येथील ई क्लास शेत सर्वे नं.7 क्षेत्र.9.92हे आर हे जमिनीपैकी 1.00हे आर जमिनीची मोजणी सुद्धा झालेली आहे. दि.13/2/2014 रोजी भूमी अभिलेख कार्यालय उमरखेड यांनी नियमानुसार सदर जागेची मोजणी सुद्धा केलेली आहे.

सदर प्रकरण जवळपास अंदाजे 17 वर्षापासून आपल्या महसूल विभागाकडे प्रलंबित आहे सदर प्रकरण चालवणारे दिवंगत रेहमत खान मुनीर खान पठाण यांचे निधन दि 2 एप्रिल2025 रोजी झालेलेआहे. परंतु सदर मुस्लिम दफनभूमीची मागणी आज पावे ते पूर्ण झालेली नाही.

सदर मोजणी झालेल्या मुस्लिम दफनभूमीची मागणी मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय उमरखेड यांनी स्वत व्यक्तिशः लक्ष घालून ही मागणी तात्काळ शासन दरबारी नियमानुसार पाठपुरावा करून मुस्लिम समाजाच्या भावनांची सामाजिक मागणी तात्काळ मार्गी लावावी. असे निवेदन दिवंगत उपसरपंच रेहमत खान पठाण यांचे चिरंजीव मोहसीन खान रेहमत खान पठाण यांनी दिले आहे.






