
करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)
ढाणकी – तीन चार दिवसांपासून पडत असल्यालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरखेड-ढाणकी-हिमायतनगर बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने गांजेगाव पुल मंजूर होऊ शकला नाही
आ. हेमंत पाटील यांनी खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन समारंभ गांजेगाव येथील सभेत गांजेगाव पुल मंजूर झाला त्यासाठी 30कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले काय झाले माहित नाही अद्याप पुल मंजूर झाला नसल्याने समजते आमदार, खासदार या गांजेगाव पुलाचे मागणी कडे लक्ष देतील का?

🚨पुलावरुन पाणी, वाहतूक बंद – गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. यामुळे ढाणकी ते हिमायतनगर या राज्य मार्गावरील गांजेगाव पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करावी. हा मार्ग मराठवाड्यातील हिमायतनगर, उमरखेडला विदर्भातील यवतमाळ, पुसदशी माहुर तीर्थस्थळ जोडणारा एकमेव थेट रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही विभागांमधील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

🚨एसटी-खाजगी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल-
पुलावर पाणी आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड-ढाणकी-गांजेगाव-हिमायतनगर मार्गावरील सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. खाजगी जीप आणि मालवाहतूकही बंद आहे.
याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार आणि रुग्णांना बसला आहे. पर्यायी मार्गाने जाण्यासाठी प्रवाशांना मार्गे सुमारे 25 ते 30 किमीचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा खर्च वाढला आहे. एक प्रवासी म्हणाले, “रोजच्या कामासाठी हिमायतनगरला जावे लागते. आता 2 तासाऐवजी 4 तास लागतात. रुग्णाला न्यायचे असल्यास खूप अडचण होते.”

🚨दरवर्षीची समस्या, नागरिक आक्रमक स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षांपासून दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. 2 ते 3 महिने हा भाग संपर्कापासून तुटतो. त्यामुळे या भागातील व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. याविरोधात ढाणकी, गांजेगाव, हिमायतनगर येथील नागरिकांनी आता एकत्र येत नवीन उंच पूल बांधण्याची मागणी लावून धरली आहे.
ग्रामस्थांच्या मागण्या:
•सध्याच्या पुलापेक्षा 10-12 फूट उंचीचा नवीन पूल तातडीने मंजूर करावा
- पुराचा धोका नसल्याने बारमाही वाहतूक सुरू राहील अशी व्यवस्था करावी
- यासाठी विशेष निधी उपलब्ध करून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. “लहान पूल बांधून दरवर्षी दुरुस्ती करण्यापेक्षा एकदाच उंच आणि भक्कम पूल बांधा. आमचा संपर्क तोडू नका” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी कमी होईपर्यंत नागरिकांनी पुलावरून जाऊ नये आणि जीव धोक्यात घालू नये पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक करावी.






