
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – तालुक्यातील अंबाळी येथे आयोजक अविनाश पाटील यादवकुळे मित्र मंडळ व अंबाळीग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके नेते, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

प्रतिमा पूजन: अंबाळीचे आदरणीय सरपंच दादाराव धुमाळे आणि. संभाराव पाटील यादवकुळे यांच्या शुभहस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून या आरोग्य शिबिराची मंगलमय सुरुवात करण्यात आली. आरोग्य लाभ: या शिबिरात परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतला.


“निरोगी समाज, हीच विकासाची खरी पाऊलवाट!”अशा या स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील इंचार्ज डॉक्टर दवणे साहेब, निलम लेखूळे, CHO रवींद्र शिंदे आरोग्य सेवक गट प,शिवाजी श्रीरामे HA, पंचायत आरोग्य विस्तार अधिकारी व मंजू मुनेश्वर, गट पर्वतक आशा सेविका तसेच अंबळीतील तील प्रतिष्ठित मंडळी नारायण मोरे, दिगंबर जाधव, मंगेश यादवकुळे, गजानन सूर्यवंशी दया जाधव सुरेश यादवकुळे अरविंद यादवकुळे दादाराव चंद्रवंशी व ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य अंगणवाडी सेविका व गावातील मित्र मंडळ प्रतिष्ठित सर्व नागरिकानी कार्यक्रम साठी परिश्रम घेतले.







