
हदगाव एसटी आगारातील एसटी प्रशासनाच्या मनमानी, अन्यायी कारभारास व कर्मचाऱ्यांना जाणून बुजून वेठीस धरण्याच्या वृत्ती ला कंटाळून अखेर एसटी कर्मचाऱ्याचा संतापाचा बांध फुटला असून दिनांक 30 ऑगष्ट पर्यंत कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हदगांव एसटी प्रशासनाची मनमानी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचाआमरण उपोषणाचा इशारा!प्राप्त माहितीनुसार, हदगाव आगारात एसटी प्रशासन यांच्याकडून कर्मचाऱ्यांवर सातत्याने अरेरावी करणे, नियमांना बगल देऊन मनमानी पद्धतीने कामे लादणे आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर संघटनेला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. दिनांक ३० ऑगस्टपर्यंत संबंधित एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर आळा घालून कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास, आगार परिसरात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.

या आंदोलनामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आगार व्यवस्थापन व एसटी महामंडळ प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.सदर प्रकरणाची एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन मुजोर हदगांव एसटी प्रशासनाला पायबंद घातला नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात शाळकरी मुले एसटी ने येजा करीत असतात शिवाय मुख्य दळणवळणाचे साधन म्हणून शेतकरी कष्ठकरी मोठ्या आशेने एसटी कडे बघतात. अशात
एसटी प्रशासनाचा बेजबाबदारपणा एसटीला परवडणारा नाही.








