✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – पोलीस ठाणे उमरखेड येथे दिनांक २४/०५/२६ रोजी अप. क्र. ४३७/२०२६ कलम १०९(१), १०३(१), १०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा नोंद आहे, गुन्हयातील फिर्यादी नामे ज्ञानेश्वर मारोती सुरोशे वय ३१ वर्षे, रा. वडद ता. महागाव यांनी दिलेल्या तक्रारीची संक्षीप्त हकीकत अशी आहे की, दिनांक २३/०५/२६ रोजीच्या रात्रीला पिकअप वाहन क्रमांक MH २९ BE ८९१५ मध्ये गोवंश जातीचे जनावरे उमरखेड कडे घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्यावरुन नमुद पिकअपच्या मागे महेश सुरोशे इतर गोरक्षक मोटार सायकलने व कार क्रमांक MH १२ PT ८६३४ मधील गजानन मारोती सुरोशे हे कारने पाठलाग करीत असताना घाटामध्ये पिकअप चालक याने गोरक्षकाच्या मोटार सायकलला कट मारल्यामुळे ते डिवायडर वर पडुन जखमी झाले, कार चालक पिकअपचा पाठलाग करीत ग्राम सुकळी येथे पिकपच्या मागे गेले असता शेख सुलतान शेख अल्लावल्ली व समुहांने मिळुन कार क्रमांक MH १२ PT ८६३४ वर मागुन पुडुन मोठ- मोठ्या दगडाने, लाकडाने हल्ला करुन कार मधील गजानन मारोती सुरोशे यांना ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार मारले.

गुन्हयाचे तपासादरम्यान आजपावेतो आरोपी नामे १) शेख सुलतान शेख अल्लावली वय २७ वर्ष रा सुकळी ता. उमरखेड २) शेख अरबाज अहमद हुसैन वय २४ वर्षे रा. राजेंद्रप्रसाद वार्ड उमरखेड ३) मोहम्मम्द परवेज मोहम्मद शफी वय २४ वर्षे रा रहीमनगर उमरखेड ४) नोमाननोदिदन रियाजोदिदन काझी वय २० वर्षे रा सुकळी ता. उमरखेड ५) शेख असगर अहमद अब्दुल हामीद वय २८ वर्षे रा. सुकळी ता. उमरखेड ६) नुरोददीन ईक्रामोददीन काझी वय ३० वर्षे रा. सुकळी ता.उमरखेड ७) मोहम्मद अरबाज मोहम्मद शफी वय २३ वर्षे रा रहीमनगर उमरखेड ८) मोहम्मद अजिस उर्फ अजिज मोहम्मद हानीफ वय ३४वर्षे रा करोडी रोड उमरखेड यांना अटक करण्यात आली असुन ०१ आरोपी फरार व ०१ विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. सदरचे गुन्हयात एकुण १० आरोपीतांचा सहभाग असल्याबाबत तपास सुरु असुन, नमुद गुन्हा हा संघटित गुन्हेगारीतुन केलेला असल्याचे तपासात दिसुन आल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ३ (१) (i), ३ (२) व ३ (४) अन्वये वाढीव कलम समाविष्ट करण्याची परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळकडुन विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी दिनांक २२/०७/२०२६ रोजी मंजुरी दिली असुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कायदयाचे कलम समाविष्ट करुन सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, प्रभार उमरखेड उपविभाग अमर मोहीते हे करीत आहेत.जिल्हयात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होवुन त्यांचेवर कायदेशीर कठोर कारवाई आवश्यक असल्याने अशा प्रकारे शरीराविरुध्द व संपत्ती विषयक गुन्हे करणारे, अवैध रेती तस्करी, गावठी दारु तसेच टोळीने दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर आगामी काळात MCOCA तसेच MPDA कायदयाअंतर्गत मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता (भा. पो. से.) अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, उप. विभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते सा. यांचे मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात येणार असुन अशा गुन्हेगांराची गय केली जाणार नाही.








