✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

उमरखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरखेड नगरपरिषद प्रशासनाने केवळ कुत्र्यांना इंजेक्शन देऊन पुन्हा रस्त्यावर सोडण्याची औपचारिकता न करता, या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. नागरिकांच्या जीविताला प्राधान्य देत मोकाट कुत्र्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.








