
उमरखेड (दिनांक 21 जुलै) : स्थानिक ‘रिदम कराओके क्लब’, उमरखेड (जि. यवतमाळ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुप्रतीक्षित आणि भव्य ‘कराओके स्पर्धा’ रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ रोजी महागाव रोडवरील डॉ. माने यांच्या घराजवळ असलेल्या क्लबच्या सभागृहात प्रचंड उत्साहात आणि हाऊसफुल्ल गर्दीत संपन्न झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून उमरखेड आणि परिसरातील नवोदित गायकांच्या सुरांचा महा मुकाबला रंगला होता, छ.संभाजीनगर , सातारा वाशिम यवतमाळ नांदेड नागपूर इत्यादी ठिकाणाहून स्पर्धक आले होते.ज्याला संगीतप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या संगीत महोत्सवासाठी डॉ. कु. लावणीश्री विद्याश्री यमचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून स्पर्धेची बहारदार लावणीने सुरुवात करण्यात आली. या संपूर्ण सोहळ्याचे प्रायोजकत्व ळ शहरातील नामांकित ‘माता कन्याकापुरम टाउनशिप’ व अनिकेत इंटरप्राईजेस यांनी भूषविले होते.

अटीतटीच्या लढतीत ‘या’ विजेत्यांनी मारली बाजी:स्पर्धकांनी एकाहून एक सरस गाणी सादर करून परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंतिम विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रथम बक्षीस (रु. ५,०००/- व भव्य ट्रॉफी): [ निवेदिता जोशी ..नांदेड ] (तर्फे: अनिकेत एंटरप्राइजेस – श्री मकरंद पत्तेवार) द्वितीय बक्षीस (रु. ३,०००/- व भव्य ट्रॉफी): [ प्रशांत उलांडे..सातारा ] (तर्फे: माता कन्याकापुरम टाउनशिप – श्री गजानन लंकेपिल्लेवार) तृतीय बक्षीस (रु. २,०००/- व भव्य ट्रॉफी): [आशा राठोड बेलखेड ] (तर्फे: धन्वंतरी हॉस्पीटल – डॉ. धनंजय व्यवहारे) चतुर्थ बक्षीस (रु. १,२००/- नगद): [ मनीष वरकड…यवतमाळ ] (तर्फे: ॲड. संजय गंगाने) पंचम बक्षीस (रु. १,०००/- नगद): [ कु.स्वरांजली जाधव …हदगाव ] (तर्फे: वानखेडे हॉस्पीटल – डॉ. प्रफुल वानखेडे) विशेष प्रोत्साहनपर पुरस्कारांचे वितरण:मुख्य बक्षिसांशिवाय स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी विशेष कलागुणांचे सादरीकरण करणाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक श्री आनंदबाबा शिंदे, डान्स टीचर कोमलताई सोनटक्के, डॉ. अंबादास कदम, श्री अविनाश भाऊ निल्लावार, आणि लोककलाकार श्री भिमराव तिमाजी वरुडे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या विशेष पुरस्कारांचा समावेश होता. या प्रोत्साहन पर बक्षीसाचे मानकरी खालील प्रमाणे कु . स्वरा पवार उमरखेड, साधना श्रीपतवार दारव्हा , आनंदा डोंगरे करंजी , असत खान उमरखेड, कु. भक्ती भोयर, वाशिम.. इत्यादी. स्पर्धा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी.. क्लब चे सदस्य डॉ. धनंजय व्यवहारे , श्री गजानन लंके पिल्लेवार , एडवोकेट श्री संजय गंगात्रे , दिग्दर्शक आनंद बाबा शिंदे , प्रा.राजेश डहाके , श्री मकरंद पत्तेवार , श्री शिवाजी आहेर , डॉ. रवींद्र चव्हाण , श्री अनिरुद्ध रेघाटे, एड. मनीष भट्टड , श्री सुरेश राठोड , श्री अविनाश निलावार, श्री दत्तात्रय गव्हाणे, श्री किशोर सारडा , श्री ऋषिकेश काळे , श्री विजय चौधरी, श्री शिवकुमार कदम आणि संचालक : श्री संजय मुटकुळे सर व सौ.शीतल मुटकुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अशा दर्जेदार स्पर्धांमुळे उमरखेडमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळत असून, रिदम कराओके क्लब शहरातील सर्व संगीत प्रेमींचा आवडता म्युझिक प्लॅटफॉर्म बनत आहे.भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. क्लबचे संचालक : संजय मुटकुळे यांनी शेवटी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक, स्पर्धक आणि प्रायोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







