🚨(डिटेक्शन ब्रँच (DB) उमरखेड यांची कारवाई)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – दि. 17/05/2026 रोजी सोबत पोउपनि सागर इंगळे, पोशि/2673 दिगांबर गिते असे मा. पोनि सां यांचे आदेशाने उमरखेड शहरात अवैध गांजा सेवन, अवैध शस्त्र बाळगणे, तसेच पाहिजे फरार आरोपी शोध कामी साना क्र 47/2026 वेळ 18/53 वा अन्वये शहरात पेट्रोलिंग करीत असतांना, अंदाजे 19/00 वा चे दरम्यान मक्का मस्जिद कडुन खाली प्लॉटींग कडे जात असतांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम ज्याने लाल रंगाची टोपी, पांढऱ्या रंगाचे शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट परीधानं केलेली असुन त्याने कमरेला घाव लावुन स्मशाने भुमी कडुन बसवेश्वर मंदीराकडे येणारे कच्या रस्त्याने येत आहे अशी माहिती मिळाली आहे.

वरुन आम्ही व सोबत पोउपनि सागर इंगळे, पोशि/2673 गिते, असे आम्ही दोन पंचासमक्ष लॅपटॉप, प्रिंटरसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता स्मशाने भुमी कडुन बसवेश्वर मंदीराकडे कच्च्या रस्त्याने नमुद वर्णनाचा इसम दिसल्याने आम्ही 19/15 वा. थांबवुन आमचा तसेच पंचाचा परिचय देवुन त्यास येथे येण्याचे कारण समजावुन सांगुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव निसारबाबर खान जफर उल्ल्हा खान, वय-36 वर्ष, रा. जामा मस्जिद वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ असे असल्याचे हेच संशयीत इसम असल्याचा खात्री झाल्याने आम्ही आमची व पंचाची अंगझडती देवुन सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक लोखंडी जु.वा. लाकडी मुठ असलेला घाव ज्याची एकुण लांबी 14.8 इंच, पात्याची एकुण लांबी 9.2 इंच, पात्याची मध्यभागी रुंदी 1 इंच, मुठीची लांबी 5.6 इंच, कि.अं 300/- रुपये चा मुद्देमाल अवैधरित्या व विनापरवाना मिळुन आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले.

यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 अन्वये अप क्र. 402/2026 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे.अवैध धंदे शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी तसेच इतर माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सह कार्य करावे ही विनंती.

सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/2673 दिगांबर गिते, चालक/924 आकाश पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







