
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक ) मो.9823995466
उमरखेड:- प्रशासकीय उदासीनता आणि लोकप्रतिनिधी नगराध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड पुन्हा एकदा अंधारात बुडाला आहे. मागील 11 एप्रिलपासून येथील सम्यक बुद्ध परिसरातील स्ट्रीट लाईटचा लपंडाव सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

•नेमकी अडचण काय? मिळालेल्या माहितीनुसार, या भागात एक दिवस पथदिवे सुरू राहतात आणि त्यानंतर सलग 3 – 4 दिवस बंद असतात. यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात पूर्णपणे अंधार पसरतो, ज्याचा फायदा असामाजिक तत्वांना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

•अधिकारी आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष:- नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. संबंधित कर्मचारी शिंदे आणि अभियंता राठोड हे सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संतापलेल्या नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांना परिस्थितीची कल्पना देऊनही त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

• नागरिकांची मागणी :- आम्ही वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसेल, तर संबंधित कर्मचारी आणि अभियंत्याची चौकशी झालीच पाहिजे. वेळेत सेवा न देणाऱ्यांवर कडक कारवाई करा,” अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी जनहित 24 न्यूज नेटवर्क’ च्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

चौकट – दिनांक: ११ एप्रिलपासून समस्या कायम. प्रभाग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड (सम्यक बुद्ध परिसर). तक्रार: एक दिवस प्रकाश, चार दिवस अंधार!दोषी: नगरपरिषद उमरखेडचे संबंधित विभाग आणि सुस्त लोकप्रतिनिधी. नागरिकांचा सवाल: “कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद मुहूर्त शोधत आहे का?”







