✍️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466

यवतमाळ – जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.


दिनांक 05/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन बिटरगांव हददीत मौजे ढाणकी येथे हजर असतांना रामप्रसाद आईनाथ गोपेवाड रा.हरदडा फाटा यांच्या ताब्यातील विना क्रमांक टाटा कंपनीच्या 407 टेम्पो मध्ये धारधार तलवार असून तो उमरखेड बाजूकडून ढाणकी बाजूकडे टेम्पोसह येथे असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने त्याचे स्वतःचे ताब्यात धारधार तलवार बाळगून आहे.

अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष मौजे ढाणकी येथील सोईट फाटा येथे सापळा लावून थांबले असता उमरखेड बाजूकडून ढाणकी बाजूकडे विना क्रमांक टाटा कंपनीची 407 टेम्पो यास थांबवून झडती घेतली असता टाटा कंपनीच्या 407 टेम्पोच्या कॅबीन मध्ये एक धारदार लोखंडी तलवार मिळून आल्याने ती जप्त व टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 2,01,000/- रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे रामप्रसाद आईनाथ गोपेवाड वय 21 वर्ष, रा. हरदडा फाटा ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्यावर कलम 4, 25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश राठोड सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







