✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

नागापूर (रुपाळा) येथे दि.1-7-2026 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री / हरित क्रांतीची प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळा नागापूर (रुपाळा )येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच नागापूर (रूपाला) गावचे उपसरपंच स्वर्गीय रेहमत खान पठाण यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव. मोहसीन रेहमत खान पठाण, सरफराज रहमत खान पठाण यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही ,पेन, यांचे वाटप करण्यात आले.


तसेच गावातील सरपंच प्रशासक सौ सुलावती राजाराम डुकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.







