
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – तालुक्यातील टाकळी रोड येथील शेतकरी कुरमे यांच्या शेतामध्ये गव्हाळ्या जातीचा विषारी नाग आढळून आला. शेतकऱ्यांनी लगेच कॉल करून सर्पमित्र कैलास कदम यांना बोलवण्यात आले.

स्वतःचा जीव धोक्यात टाकून सर्पमित्र कैलास कदम विषारी नागाला सुखरूप पकडून जंगलात सोडून जीवनदान दिले. समाजाला अशा सर्पमित्राची फार आवश्यकता आहे अनेकांचे जीव यांच्या दक्षतेने बचावतात. प्रशासनाने अशा सर्पमित्राची दखल घेऊन त्यांना गौरवित करण्यात यावे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.








