
🚨तत्काळ सुधारणा न झाल्यास आंदोन करू – विद्वान केवटे
✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)
उमरखेड – एकीकडे स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर देश आनंदोत्सव साजरा करत असताना उमरखेड विधानसभा क्षेत्रातील पैनगंगा अभयारण्यातील बंदीभागातील दुर्गम गावे मात्र विकास आणि मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत.”स्वातंत्र्याच झालं काय आमच्या पर्यंत आलंच नाय!” अशी भावना इथल्या जनतेची झालेली आहे.बहुजन मुक्ती पार्टीचे विद्वान केवटे यांचा बंदीभागात संघटनात्मक दौरा सुरू आहे

.ह्या दौऱ्यांतर्गत त्यांनी सोनदाबी,गाडी बोरी, थेरडी या गावांना भेट दिली.दरम्यान थेरडी बोरी दरम्यानच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे पूल पूर्णतः जीर्ण झाला असून शासकीय बसेस व खाजगी वाहने देखील जाणे येणे बंद झालेले आहे. थेरडी येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे जाण्यासाठी अथवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका देखील ह्या पुलाचा अवस्थेमुळे जाणे येणे बंद आहे. यामुळे जनतेला थेरडी ते बोरी असा पायी प्रवास करून ऐन पावसाळ्याच्या दिवसात हेळसांड करून घ्यावी लागत आहे. याच रस्त्यावरून ढानकी व उमरखेड तालुक्याला विद्यार्थी,रोजगार, मजूर,शेतकरी,महिला,व्यावसायिक ये जा करत असतात.परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमुळे सर्वांचे दळण वळणच बंद झालेले आहे.


तसेच बोरी येथील शाळेत सात वर्ग केवळ दोन शिक्षकांच्या भरवष्यावर असून थेरडी येथील शाळेतील पाचही वर्ग खोल्या पावसाच्या पाण्याने गाजत आहेत.”उमरखेड विधानसभा क्षेत्रात भाजपा चे तीन टर्म आमदार असताना बंदीभागात साधे रस्ते करू शकले नाही. ही विकासकामे लवकरात लवकर न झाल्यास संविधानिक मार्गाने महामोर्चाचे आयोजन करू.”असा इशारा यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे विद्वान केवटे यांनी दिला.यासह तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, ह्या भागाकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत.ह्या शब्दात त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षित व उदासीन भूमिकेवर सडकून टीका केली.दरम्यान ह्या क्षेत्रातील गावातील नागरिकांनी अनेक समस्यांसंदर्भात चर्चा केली.

यावेळी मारुती लांडगे, वैभव धोपे,जयदीप नखाते, सिद्धार्थ कानिंदे, सुदाम उघडे,माधव तारमेकवाड,विठ्ठल पेंटलवाड,आशुतोष तारमेकवाड ,मल्हारी दवणे,मुजाहिद पठाण दीपक भिसे, दिलीप पाटील,गंगाराम धनवे, मुजाहिद पठाण,शेख जब्बार,यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.







