✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 14 जुलै) रोटरी क्लब, उमरखेड यांच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वितरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. ०२, उमरखेड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके प्रदान करण्यात आली.

रोटरी क्लबच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या नगरसेवक इंजिनियर सुरेंद्र कोडगिवार साहेब तसेच शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. ०२, उमरखेड येथील शारीरिक शिक्षण शिक्षक गोपाल मुनेश्वर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

त्यांच्या समन्वय व सहकार्यातून रोटरी क्लबने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.शाळेच्या मुख्याध्यापक आशिष राठोड सर शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी रोटरी क्लब, उमरखेड यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले. या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी करण्यास मोठा हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







