
🚨तक्रारकर्ते समस्त महिला वर्ग व गावातील नागरिक मौजे नागापूर (रुपाळा)🚨
✍️राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड – आम्ही तक्रार अर्ज सादर करतो की, मौजे नागापूर (रुपाळा) ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे गेल्या कित्येक दिवसापासून अवैध रित्या दारू विक्री केल्या जात आहे. यामुळे नागापूर (रूपाळा) येथील अनेक महिलाचे संसार उध्वस्त झाले आहेत. दररोज राजरोस्त पणे 24 तासदारू विक्री केल्या जाते. परवाना धारक दारूच्या दुकानांना वेळेची मर्यादा असते.

पण नागापूर (रुपाळा) येथील अवैध दारू विक्रीत्यानी 24 तास परिसरात थेमाना घातले आहे. दारुडे दारूच्या नशेत महिला मुलींची छेड काढत आहेत. एवढे सारे होत असताना उमरखेड पोलीस स्टेशनचे संबंधित बिट जमादार हप्ते खाण्यात व्यस्त आहेत. बीट जमादार स्वः हप्ते जमा करण्यासाठी नागापूर (रु.) येथे येत असतो. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी हिम्मत वाढली असून ‘आम्ही बीट जमादाराला हप्ता देतो. आमचे कोणीस काही वाकडे करू शकत नाही.” अशी उद्धट व अरेरावीची भाषा अवैध दारूविक्रेते करीत आहेत. त्यामुळे सदरीलबीट जमादाराची चौकशी करून त्यांची हक्काल पट्टी करण्यात यावी जेणे करून पुन्हा अशी हिम्मत करणार नाही.याच भागात धार्मिक संस्थान बालकदास आहे.

तेथे दारुडे दारू पिऊन रिकाम्या बॉटल फेकत आहे व उपद्र करतात या पूर्वी सदरील भागात देवी देवी देवतांचे दारुड्या लौकाकडून विटंबना अली होती. त्यामउळे समाजमन खराब होत आहे व तरून पिढी बरबाद होत आहे त्यांना व्यसन लागत आहे व दारू पिऊन मंदिराशेजारी भिंती वर लघवी करून परिसर अस्वच्छ करीत आहे. त्यामुळं महिला वर्गाना असुरक्षितता वाटत आहे व असाच सुरु राहील तर काही घातपात घडू शकते. मागील 5 महिन्यात नागापूर (रु.) भागातील 5 तरुणाना भेसळयुक्त दारु मुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

या सर्व प्रकाराला गावातील आम्ही महिला त्रासून गेलो असून याचा वेळीच बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी मेहेरबान साहेबांनी या प्रकरणाकडे त्वरित वैयक्तिक लक्ष देऊन आम्हा महिलांना न्याय मिळवून व्यावा. अशी विनंती केली आहे.

यावेळी बबन कोंडबा पुसांडे महाराज, सौ. यमूना आनाव, अंजान, शंकर सरोश, सरोज नंदकिशोर देशमुख, रत्नमाला खिल्लारे,बबिता दिघाडे, बाली राठोड, प्रियंका जाधव,शोभा जाधव,विजया काळे, उमेशा आडे,के. कापसीकर,शितल मूरमूरे, पुजा गवर,पी वाढवे (माजी सरपंच),सारीका गवर, आशा बुरकुले, समीता बुरकूले, उषा भिसे, रंजना भिसे,कुंडलीक विनकरे यांच्या सह अनेक महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.






