💥 मला राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहणार – शामभाऊ धुळे (सामाजिक कार्यकर्ते)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – सध्या उमरखेड शहरामध्ये सार्वत्रिक निवडणुक आरक्षण जाहीर झाल्यापासून राजकीय पक्ष्यांच्या हालचालीला वेग अधिक वाढला आहे. ज्या प्रभागात आरक्षण सुटले आहे त्या प्रभागात राजकीय पक्षाकडून तगडा उमेदवार शोध प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामध्येच प्रभाग पाच मधून मागील अनेक वर्षापासून भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये आहोरात्र काम करणारे, समाजाच्या अडीअडचणीला साथ देणारे, कुणाच्याही सुखदुःखात सहभागी होणारे, नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, दादासाहेब शेळके यांचे विश्वासू संघटनेशी एकनिष्ठ असलेले इंदिरा गांधी नगर येथील स्थानिक रहिवासी तथा जनहित 24 न्यूज चॅनल चे मुख्य संपादक शामभाऊ धुळे हे एसी राखीव प्रभाग 5 मधून नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आमच्या महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलला बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, मला राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, इंदिरानगर मधील सर्व मागासवर्गीय व दलित नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात पण या वार्डाचा विकास मात्र झालेला दिसुन नाही. मी आता या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून इंदिरानगर ची दिशा दशा बदलण्याच्या आणि थांबलेले विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

माझ्या पाठीशी माझा समाज तसेच माझ्या इंदिरानगर मधील सर्व नागरिक आणि भीम टायगर सेना संघटनेतील कार्यकर्ते माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहणार याची मला जाणीव आहे.अशी रोखठोक प्रतिक्रिया जनहित 24 न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक सिद्धार्थ दिवेकर यांना चर्चा करतांना माहिती दिली.



