🛑 “उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा”

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो. 9823995466
उमरखेड – तालुक्यातील देवसरी गावाचे पुनर्वसन अंबवन उमरखेड येथे होत असून वरील संदर्भ क्र.२ नुसार पहिल्या टप्पयातील अनेक कामे सुरूच झाली नाहीत. त्याचा अहवाल मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षाकडे पाठविला आहे. सदर कामे याची कालमर्यादा संपून गेली आहे.शिवाय दुसरा टप्पा त्वरीत सुरू करून तेथे २६६ घरांची निर्मीती होणे अत्यंत गरजेचे आहे.
पुरग्रस्त लोकांची ही तातडीची मागणी आहे. कृपया विनाविलंब ही कामे सुरू करून लोकांना स्थलांतरण निधींचे त्वरीत करावा.गेल्या २१ वर्षापासून देवसरी पुरग्रस्त साततयाने संघर्ष सुरू ठेवला असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पुनर्वसित नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी शासनाकाडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. देवसरी ग्रामपंचायत कायम पुरग्रस्तांच्या पाठीशी राहीली आहे. शासनाने १४ आक्टोबर २०२२ च्या शासन निर्णय निर्गमीत केल्यानंतर पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला. आणि १५ सप्टेंबर २०२५ रोजी पुनर्वसनाच्या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांच्या मनात मोठ्या आशा पल्लवित झाल्या.शिवाय दुसरा टप्पा त्वरीत सुरू करून तेथे २६६ घरांची निर्मीती होणे अत्यंत गरजेचे आहे. पण येथे तर पहिलाच टप्पा अपूर्ण आहे. ही कामे त्वरीत सुरू करावी अशी पुरग्रस्त लोकांची तातडीची मागणी आहे. कृपया विनाविलंब ही कामे सुरू करून लोकांना स्थलांतरण निधींचे त्वरीत वितरण करावे. आणि दिलासा द्यावा.तथापि, आजही पुनर्वसनाची कामे अपूर्ण असून सुरू असलेल्या कामांची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे पुनर्वसन नागरिक यांच्या भावना अत्यंत तिव्र झाल्या आहेत. अत्यंत संवेदनशीलतेने आपल्या निर्दशानात आणून देण्यात येते की, ही लोक मुलभूत सुविधांपासून वंचित असून कसेतरी जीवन कंठत आहे. हे फार भयंकर आहे. अनेकांनी रोजीरोटीसाठी गाव सोडले आहे. अनेक अडचनींना ही मंडळी उन्ह, पाणी, वादळ, वारा यांचा सामना करीत लोहरा येथील गायरानावर बांदून दिलेल्या तट्याच्या निवाराऱ्यात राहत आहेत.. दि.०७/१०/२०२५ ला. मा. जिल्हाधिकारी महोदय तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सबंधित विभाग प्रमुख उपस्थीत होते. या बैठकीत अंबवन पुनर्वसन प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि आजपावेतो अपेक्षित गती प्रगती दिसून येत नसल्याने पुनर्वसित नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे आज आम्ही सर्व पुनर्वसित नागरिक शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने मोर्चा काढून आपल्या मार्फत शासनापर्यंत आमच्या भावना आणि मागण्या पोहचवीत आहोत.

🔥आमच्या प्रमुख मागण्याः- १. पुनर्वसनाची सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. २. पुनर्वसित कुटुंबासाठी घरे बांधनीचा कार्यक्रम तात्काळ हाती घेऊन घरे बांधून देण्यात यावीत. अजुन ५० तरी घरे वाढवून देण्यात यावीत. ३. पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, आणि इतर प्रास्तवीत मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात.४. या प्रकल्पातील सर्व कामांसाठींचा निश्चित कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात यावा. ५. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमीत पाहणी करून कामांना गती द्यावी. ६. पुनर्वसन प्रकल्पातील कामांचा अद्ययावत प्रगती अहवाल नागरीकांसमोर सादर करावा.७. मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्येतेखाली संबंधीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावण्यात यावी.

आलेल्या मागण्या जिल्हाधिकारी, यवतमाळ तसेच माननीय मंत्री महोदय, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तातडीने पाठवून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, ही नम्र विनंती.पुनर्वसित नागरिकांना न्याय मिळावा, शासनाने देवसरी (अंबवन, उमरखेड) साठी शासन निर्णयानुसार प्रस्तावीत ११ नागरी सुविधांची सर्व कामे तातडीने पूर्ण व्हावीत, हीच आमची रास्त मागणी आणि अपेक्षा आहे.

आपण या मागण्यावर सकारात्मक कार्यवाही कराल, अशी आम्हाला आशा आहे. ही विनंती. अशी मागणी सौ. मीनाक्षी चंद्रमणी सावतकर (सरपंच देवसरी) यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी देवसरी गावातील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






