✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014

उमरखेड – आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपूर येथे 20 जून रोजी महामोर्चा निघणार असून या मोर्चाच्या संदर्भात सुमेध बोधी बुद्ध विहारात एका महत्वपूर्ण बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत उमरखेड तालुक्यातून हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्तित रहावेत या साठी नियोजन करण्याकरिता विचार मंथन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्या आणि तालुक्यात बेठकी घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड येथे बेठक पार पडली.

आजच्या बेठकीला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्तित होते बेठकीचे प्रास्ताविक रमेश बोरकर मार्गदर्शक प्रा.डॉ चंद्रकांत सरदार, नारायणराव स्थुल मुख्य मार्गदर्शक तथा अध्यक्ष प्रा अंकूश वाकडे (सर्व समतापर्व संयोजन समिती तथा उपवर्गीकरण विरोधी मोर्चा नागपूर चे आयोजक यवतमाळ, प्रमुख अतिथी मा आ विजय खडसे, सभापती पस प्रजानंद खडसे, प्रकाश हापसे, सुत्रसंचालन प्रा राजाभाऊ धांडे आभार प्रोफेसर अनिल काळबांडे यांनी मांडले.

तरी उमरखेड तालुक्यातून हजारो च्या संख्येने समाजबांधवांनी सदरील मोर्चास उपस्तित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.







