✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड :- (दिनांक २३ फेब्रुवारी) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दत्तक ग्राम मरसूळ, उमरखेड येथे आयोजित केले होते.

या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले, दिनांक २३ फेब्रुवारी, रविवार रोजी शिबिराचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

समारोपाच्या दिवशी कर्मयोगी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन केले. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गाव स्वच्छ्ता आयोजन व त्याचबरोबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याचे गीत गायन करून संत गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले.

या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. प्राचार्य. डॉ. माधवराव बा. कदम व कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार साहेब शंकर पांचाळ, उमरखेड, श्री. आनंद शिंदे उपस्थित होते. गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक श्री. मनोज सु कुबडे, श्री. उत्तम को. बनसोड, पोलीस पाटील श्री काशिनाथ पाटील कदम, शाळा समिती सदस्य श्री बंडू पाटील कदम, लक्ष्मण बेंडके तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, श्री. सुभाष स. भालेराव, मुख्याध्यापक हे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा मरसुळ येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक मिटके मॅडम यांनी केले, समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले सात दिवसात केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेले अनुभव कथित केले. निरोप समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शितल गिरबिडे, बंटी रुढे, स्वागत गीत संगीता पवार या विद्यार्थिनीने केले.
गो.सी गावंडे महाविद्यालयातील प्राचार्य मा.माधवराव बा. कदम तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी तसेच यवतमाळ जिल्हा अखिल कुनभी समाज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राम देवसरकर साहेब व सचिव आदरणीय यादवराव राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात व यांच्या शुभेच्छांनी सर्व कार्यक्रम नियमितपणे पार पडले जातात.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून सर्व कार्यक्रमांची आखणी केल्या गेली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, अर्चना मीटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.





