✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

पोफाळी – भव्य दिव्य अशा मिरवणूक सोहळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गगनमाळ आजच्या दिनाच्या अवचित्त साधून महादीप वीर सम्राट बालाजी कांबळे जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे विमानवारी होणार आहे.

कन्हैया सतीश मोरे, बॅडमिंटनपटू वैष्णवी सदाशिव भुसारे या सर्वांची वाजत गाजत पूर्ण गावातून मिरवणूक करण्यात आली.तसेच गावातील सर्व मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. विद्यार्थ्यांचा सह व पालकांचा गावकऱ्यांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळाली.

संतोष मोरे सर यांचे उत्कृष्ट असे संचालन जगदीशचंद्र गणपत दरने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोफाळी यांचे मंत्रमुग्ध करणारे भाषण, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री देविदास खोकले साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भाषण करून सर्वांची मने जिंकली, धम्मदिप लोमटे सर यांनी तर भावना पूर्ण शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच गावाचे पोलीस पाटील कैलास मोरे यांनी आपल्या शब्दातून गावकऱ्यांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती केली.आजचा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी व गावकरी यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा झाला. सर्व गावकरी मंडळीचे मनापासून आभार मानले आहे.




