🔥(उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना तक्रार अर्ज दाखल)

✍🏻 शामभाऊ धुळे ( मुख्य संपादक) मो.9823142014
उमरखेड – तालुक्यातील चुरमुरा परिसरात क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या शिवराज बाळासाहेब शिंदे यांच्यावर चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी- उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघ यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिंदे कंट्रक्शन चे चालक/मालक शिवराज बाळासाहेब शिंदे यास दिनांक 12 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये 100 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे,

परंतु दिलेल्या कालावधीच्या आतच शिवराज बाळासाहेब शिंदे यांनी ठराविक 100 ब्रास गौण खनिज उत्खनन क्षमतेपेक्षा अधिक पट्टीने गौण खनिजाचे उत्खनन चुरमुरा येथे केली आहे आणि तिथे अजूनही अवैधरित्या खनिज उत्खनन सुरू असून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून पर्यावरणात धोका निर्माण होईल असे कृत्य शिवराज बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी.

करिता लेखी तक्रार सादर.सदर ही कारवाई 2 दिवसाच्या आत करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे लेखी तक्रार उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी शामभाऊ धुळे अध्यक्ष (उमरखेड प्रेस क्लब), उपाध्यक्ष गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, बबलू भालेराव, प्रसेनजीत दिवेकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते.



