(पंचायत समिती बीडिओ यांच्याकडे उमरखेड प्रेस क्लब ची लेखी तक्रार सादर)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – तालुक्यातील विडूळ येथील मोक्षधाम मध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत 8 लाख रुपयाचा सिमेंटचा रस्ता आणि 7 लाख रुपयांचा प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून दोन महिन्यातच रस्ता पूर्णपणे रखडला गेला आहे,कामात विनापरवाना मातीमिश्रित रेती वापरण्यात आली असून कोणतेही क्युरिंग न करता काम लवकर पूर्ण करून बिले काढण्यात आली.


दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी काम पूर्ण झाल्याचे लावलेल्या फलकावर दिसून येत आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात अफरातफरी झाली असून सदर कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून अफरातफर केलेल्या लाखो रुपयाच्या निधीची रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे.

सदर कारवाई ८ दिवसाच्या आत न झाल्यास कोड पंचायत समिती पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. करिता लेखी तक्रार सादर..यावेळी तक्रारकर्ते शाम धुळे,गजानन वानखेडे, सिध्दार्थ दिवेकर,अशोक धुळे,प्रसेनजीत दिवेकर, बबलू भालेराव इत्यादी उपस्थित होते.



