✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील सेवा कॅम्पुटर येथे गणेश उत्सव दुर्गा, उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, राजकीय कॉर्नर सभा इत्यादी अनेक सामाजिक, राजकीय ऑनलाईन परवानगीच्या नावावर 500 रुपये घेतले जात आहेत, मूळ फी ही 64 रुपये एवढीच आहे.

पण नागरिकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन ज्यादा दर आकारून नागरिकांची आर्थिक लूट करून फसवणूक करीत असल्यामुळे चालक / मालकांचे ऑनलाईन पेमेंट केलेल्या व्यवहाराची तपासणी करून मेहेरबान ठाणेदार साहेबांनी योग्य चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

अशी लेखी तक्रार भिम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे आणि शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी केली आहे.



