✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – गो. सी. गावंडे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सुशिक्षित बेरोजगारांसाठी व ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी, गृहिणी, महिलांसाठी व शेतकऱ्यांनसाठी “ऑईस्टर व बटन मशरूम प्रक्रिया व उत्पादन ” या विषयावर प्रशिक्षनाचे आयोजन आले व त्यासोबतच “मशरूम उत्पादक” म्हणून आपला नवीन स्वतंत्र व्यवसाय चालू करन्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले व आळंबी लागवडी बद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी एक उत्तम जोडधंदा, कमी खर्च, कमी मेहनत आणि भरघोस नफा करून देणारा हा व्यवसाय आहे. भारतामध्ये मशरूम उत्पादन हे अजूनही एक नवीन संकल्पना आहे आणि भविष्यात मशरूमला मोठी बाजारपेठ मिळणार आहे असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रशांत अनासाने यांनी केले.

“ओयस्टर मशरूमची लागवड आणि उत्पादन” यांच्या संपूर्ण मार्गदर्शनासह, मशरूमचे मार्केटिंग ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. दरवर्षी मशरूम लागवड व प्रशिक्षण ची कार्यशाळा गो. सी. गावंडे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात होत असते वनस्पतीशास्त्रातील अंतिम च्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला मागील वर्षी काही विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात स्वतंत्रपणे आळंबी चे प्रात्यक्षिक केले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रा. डॉ. पी. डी. वंजारे, प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के, प्रा. डॉ. एस. व्ही. सुर्वे, ,प्रा. डॉ. व्ही.व्ही. कदम, प्रा. पेठे, श्री. रामेश्वर बावसकर यांनी कार्यशाळेला हातभार लावले व उपस्थिती नोंदविली.अशा प्रकारचे वेगवेगळे शिबिर महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते.



