
[नगराध्यक्षपदासाठी एस सी महिला,तर एकूण नऊ प्रभागासाठी महिला]
✍️करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)
गेल्या 1 वर्षापासून विविध राजकीय पक्षांना व जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले होते. अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अनेक पालिकांचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.


अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर ढाणकी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार दि.६ रोजी दुपारी जाहीर झाले आहे असून नगराध्यक्ष पद (SC ) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तर नऊ प्रभागासाठी महिला असणार असून ढाणकीत नगरपंचायत मध्ये महिलाराज दिसणार आहे.

नगरपंचायत ढाणकी प्रभाग साठी सोडत 8 ऑक्टोबर2025 तारखेला झाली असून 9 ऑक्टोबर 2025 ला हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दिला आहे.
प्रभाग 1 सर्वसाधारण, प्रभाग 2 सर्वसाधारण,प्रभाग 3 अ. जा ( महिला), प्रभाग 4 ना. मा.प्र, प्रभाग 5 सर्वसाधारण, प्रभाग 6 सर्वसाधारण( महिला), प्रभाग 7 अ. जमाती (सर्वसाधारण), प्रभाग 8 ना. मा. प्र( महिला), प्रभाग 9 ना. मा. प्र, प्रभाग 10 ना. मा. प्र( महिला), प्रभाग 11 सर्वसाधारण (महिला),प्रभाग 12 अ.जमाती (महिला),प्रभाग 13 अ.जमाती( सर्वसाधारण), प्रभाग 14 सर्वसाधारण (महिला), प्रभाग 15 ना. मा. प्र( महिला),प्रभाग 16 सर्वसाधारण (महिला),प्रभाग 17 सर्वसाधारण.







