✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड :- गो. सी.. गावंडे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान’ या संकल्पनेवर आधारित विशेष सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 21 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत दत्तक ग्राम नागेशवाडी येथे संपन्न होत आहे.या शिबिराचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून राम देवसरकर – अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज तथा सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राहणार आहेत, उद्घाटक म्हणून डॉ. या. मा. राऊत सचिव – यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून प्रियांका रामेश्वर जटाळे सरपंच नागेशवाडी, किरण कोळपे पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड विजय बेतेवाड – गटशिक्षणाधिकारी शामराव सुरोशे – मा. उपसभापती पंचायत समिती उमरखेड संभाजी सुरोशे माजी सरपंच नागेशवाडी , प्राचार्य डॉ एम बी कदम – उपप्राचार्य प्रा.बी यु लाभाशेटवार , पर्यवेक्षक प्रा.जी बी जाधव उपस्थित राहणार आहेत.

शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्यविषयक जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान तसेच सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या विशेष शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. बी. कानवाळे, प्रा. एस. ए. देशमुख, प्रा. ए. जे. सूर्यवंशी, शिक्षकवर्ग तसेच स्वयंसेवक विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आहेत.

“Not me but you” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव, शिस्त व नेतृत्वगुण विकसित करण्याचा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.या शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळतें.






