
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 20 मे) गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालया कडून भारतीय संविधानाची विटंबना, अवमान केल्याप्रकरणी संबंधितावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे दिनांक 21 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला बसणार असल्याचे भिम टायगर सेना यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी एका पत्राद्वारे सांगितले आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी गोसी गावंडे महाविद्यालयाने सन्मान चौथ्या स्तंभाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार बंधू यांना भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट देण्यात आली होती; पण या भारतीय संविधान प्रत मध्ये उद्देशिकेच्या अगोदर संस्था अध्यक्ष आणि संस्था सचिव यांचे फोटो टाकण्यात आल्यामुळे हा भारतीय संविधानाचा अपमान,अवमान झाला आहे.

अशी रितसर व कायदेशीर लेखी तक्रार देऊनही उमरखेड पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या राम देवसरकर (संस्थाध्यक्ष), डॉ. या.मा. राऊत (संस्था सचिव) प्राचार्य एम.बी. कदम व बी.लाभसेटवर (आयोजक) या चारही गैरअर्जदारा विरुद्ध देशद्रोह व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तात्काळ गुन्हा नोंद करावा.

तसेच इसमावर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी. इत्यादी मागण्या घेऊन शामभाऊ धुळे आणि कैलास कदम हे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार रस्त्याची माहिती आज प्रसार माध्यमावर केली पत्राद्वारे देण्यात आली.

चौकट:- उपोषणकर्ते म्हणून शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ आणि कैलास कदम तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.





