
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

मुंबई :- (दिनांक 15 मे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकार्याची बैठक पक्ष कार्यालयात प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आमदार शशिकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.

1)पक्षाच्या बैठकीत अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या समर्थणात व अप्रत्यक्ष रित्या बोध्दाना लक्ष्य करणारे भाषण झाले त्याला उत्तर देताना व पक्ष वाढीसाठी भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस मा.दादासाहेब शेळके यांनी आपल्या आक्रमक शैलीत खालील मत मांडले,


2) पक्षाने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला पाठिंबा देण्या अगोदर अनुसूचित जाती मधील वर्गीकरणाच्या फायद्या बरोबर तोट्याचाही विचार करावा.
3) आरक्षण व संविधानासाठी रस्त्यावर उतरणारा फक्त बौद्धसमाजच आहे. वर्गीकरणाच्या नावाखाली बौद्धाना टार्गेट करणार्यांनी लक्षात घ्यावे.

4) अनुसूचित जाती मध्ये 50 / लोकसंख्या असलेल्या बौध्द समाजाला नौकरी,शिक्षण व राजकीय आरक्षणात अजुनही 50/ वाटा मिळाला नाही हे बौद्ध समाजाला टार्गेट करणार्यांनी लक्षात घ्यावे
5) अनुसूचित जातीच्या 59 जाती पैकी फक्त एकच जात आरक्षणात वर्गीकरण करण्यासाठी उतावीळ झालेली असून रस्त्यावर उतरण्याची भाषा करते पण अजूनही 58 जातींना अनुसूचित जातींमध्ये मध्ये फूट नको ती एकसंघ असली पाहिजे असे 58 जातीचे मत आहे याचाही विचार पक्षाने करावा.

6) तसेच वर्गीकरणाच्या नावाखाली अनुसूचित जाती मध्ये फुट पाडण्याचा भाजपचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओळखावा.
7) नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून पक्ष वाढीसाठी काम करणार्या कार्यकर्याना पक्षाने संधी द्यावी 8) प्रत्येक प्रदेश पदाधिकार्याला कामाची जबाबदारी वाटुन द्यावी.

आदी मुद्दे पक्षाच्या बैठकीत दादासाहेब शेळके यांनी मांडून नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी महाराष्ट्रातील सर्वच प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






