
ढाणकी प्रतिनिधी ✍️ करन भरणे सर
ढाणकी – बामसेफ प्रणित राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पाचवे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन पहिल्यांदाच ढाणकी येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सतीश ननिर साहेब (राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा महाराष्ट्र प्रभारी) आणि अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे एजाज तांबोळी साहेब राष्ट्रीय समीक्षा महासचिव हे होते.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ‘भारतातील मूलनिवासी मुस्लिमांना आपले हक्क अधिकार मिळवायचे असतील तर भारतातील मूलनिवासी एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी यांच्यासोबत एकत्र येऊन आपल्या हक्का अधिकारासाठी संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पहिल्यांदाच ढाणकी येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





