
गावामध्ये स्मशानभुमी उपलब्ध नाही? जीवंत पणे ही त्रास, मरण पावल्यानंतरही प्रेत उघड्यावर जाळले.
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 30 जून) काल सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी व भर पावसात सारणाची लाकड रचन्यासाठी ताडपत्रीचा सहारा घेऊन लाकडं रचण्याची पूर्ण विधी करण्यात आली.

बाळदी गावात जिवंतपणे यातना सहन करावेच लागतात, परंतु मेल्यानंतरही प्रेताला यातना सहन करावे लागत आहे.

गावात प्रेताला अग्नि देण्यासाठी दहन शेड नसल्यामुळे प्रेतावर ताडपत्री चा सहारा घेऊन प्रेताला भर पावसात अग्नी देण्यात आली आहे, एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत्सोव मोठ्या गाजावाजा करत आहोत,

पण, बाळदी गावांमध्ये स्मशानभूमीस नाही, ही फार मोठी शोकांकिता आहे, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे.





