
(10 पुरुषांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना टूल किट ही मिळाली)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 05 जुलै) देशातील 140 हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती.

या योजने मध्ये 12 मार्च 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड मधील कामगार आणि कारागीर 100 महिला तर 10 पुरुष याचे दिवेकर दांपत्याच्या सौ. दिपाली सुरज दिवेकर आणि सुरज सुदेश दिवेकर यांनी फ्रॉम भरले होते.

फ्रॉम भरलेल्या सर्व पुरुष कारागीर व कामगार यांचे कारपेंटर कॅटेगरीचा मंजूर झाला होता. त्यांचे प्रशिक्षण शुल्क म्हणून चार हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर सर्व पुरुष कारागीर यांना प्रमाणपत्र ही पोस्टद्वारे घरपोच झाले होते आणि आता टूल किट घरपोच मिळाली आहे.

हा दिवेकर दांपत्यानाचा हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. पण ज्या महिलांचा फ्रॉम भरला आहे ते अद्यापही मंजूर झालं नाही. असे याचीही खंत दिवेकर दांपत्याने यावेळी सांगितले.

चौकट:- पी एम विश्वकर्मा योजनेतील शिलाई मशीन चा फॉर्म भरणाऱ्या सर्व महिलांचे फॉर्म मंजूर करून त्यांनाही शिलाई मशीन वाटप करण्यात यावे. – सौ. दिपाली सुरज दिवेकर (सामाजिक कार्यकर्त्या, उमरखेड)





