💥 [चिली तांडा व अमानपूर तांडा येथे अंबादास धूळे मित्र मंडळ पोफाळी चा संकल्प]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक 6 जुलै)तालुक्यात सेवाभावी अंबादास धूळे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य व स्कुल बॅग दोन लाख रुपयांचे वाटप केली महागाई च्या काळात गरीब विद्यार्थ्याचे पालक शैक्षणीक साहित्य वेळेवर मिळत नाही त्यासाठी पोफाळी जिल्हा परिषदचे समाजसेवक अंबादास धूळे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा चिली तांडा व अमानपूर तांडा येथील विद्यार्थी शिक्षण साहित्यापासून कोणीही वंचीत राहू नाही त्यांना शिक्षणासाठी साहित्य मिळाले पाहिजे..!

ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहराच्या विद्यार्थ्याबरोबर गुणवतेत टिकला पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचीत न राहीला पाहीजे यासाठी तरोडा गावाचे नागरीक व पोफाळी जिल्हा परिषद चे समाज सेवक अंबादास धूळे यांनी दोन लाख रुपयांचे साहीत्य वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

यावेळी उपस्थीत गोपाल अग्रवाल, डॉ विठ्ठलराव चव्हाण , डॉ अनिल काळबांडे राहूल काळपांडे गणेश शिलार, अंबादास धूळे, पूजा धूळे, विकास मुटकुळे विष्णू मुटकुळे, गणेश घोषे, अनिल सुरोशे रुस्तुमराव कदम, विशाल राठोड, रविकांत शिंन्दे, गजानन गरवारे, देवानंद नरवाडे, दता जारंडे, बळीराम राठोड, शुभाष नाईक, युवराज जाधव,कैलास राठोड, गोविद कारभारी, गजानन कारभारी, रूपसिंग नसिंग, शंकर थावरा, सतिष राठोड, विकास राठोड,अरविंद शिंन्दे, मोहन शिंदे, सदाशिव ठाकरे, शरद ठाकरे आदीजन उपस्थीत होते.

चौकट :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहित्य मिळत नाही गरीब पालक असतात शेतकरी व शेत मजुराचे मुले मुली शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेत असतात त्यांना अडचणीना सामोर जावे लागते तर गरीबांच्या मुला मुलीनी शिक्षण घेऊन प्रगतीपथावर जावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणुन निहेतुने संकल्प ठेवला विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांचे साहीत्य वाटप केले मित्र मंडळाच्या वतीने केले. – अंबादास धूळे (तरोडा)






