
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 07 जुलै) उमरखेड शहर व तालुका नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे सामाजिक क्षेत्रात नाव उज्वल करणारे, हुशार व्यक्तिमत्व आदरणीय दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना यांचे कट्टर समर्थ यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना शामभाऊ धुळे तथा जनहित24न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनलचे मुख्य संपादक यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!

मागील 20 ते 25 वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करणारे, उमरखेड शहर व तालुक्यात कुठेही अन्याय अत्याचाराची खबर लागतात त्याचा पूर्ण अभ्यास करून सत्य परिस्थिती जाणून पिढीतांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य यांनी आपल्या जीवनात अनेक वेळा केलेले आहेत.

तसेच भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये मागील 25 वर्षापासून एकनिष्ठ राहून समाजकार्याला सुरुवात केली आहे. भिम टायगर सेना या संघटनेच्या माध्यमातून स्वतः पुढाकार घेऊन ज्वलंत विषयावर अनेक आंदोलने, मोर्चे,अमरण उपोषणे शामभाऊ धुळे यांनी आपल्या जीवनात गाजवले. एखाद्या पिढीतांना न्याय मिळवून देण्याचे काम हातात घेतले पिढीतांना त्याचा शेवट केल्याशिवाय व त्यास न्याय मिळाल्याशिवाय शांत बसत नाहीत. सतत त्या विषयाचा पाठपुरावा करून पिढीताला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतात.

तसेच मागील अनेक वर्षापासून त्यांनी पत्रकार क्षेत्रात ही आपले पाऊल टाकून समाजाच्या समस्या लक्षात घेऊन आपल्या वृत्तपत्रांमध्ये निर्भीड व रोखठोकपणे मांडण्याचा प्रयत्न करतात.शामभाऊ धुळे यांच्याच मार्गदर्शनाखाली उमरखेड प्रेस क्लब ची काही महिन्यापूर्वी स्थापना करण्यात आली होती व त्या प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली असून त्या पदावर ते आज काम करतात.आताही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा अवलंब करून कायदेशीर मार्गाने आंदोलन, उपोषण, मोर्चे करण्यासाठी सर्वात पुढे असतात.

महाराष्ट्रात कोणताही महापुरुषांच्या विटंबनेच्या घटनेचा व इतर सामाजिक घटनेचा सर्वात पहिले भिम टायगर सेनेच्या लेटर पॅड वर कायदेशीर निवेदन देऊन त्याचा निषेध नोंदवतात.म्हणून त्यांना आंबेडकर चळवळीतील रियल टायगर असे संबोधले जातात. अशा सामाजिक कार्यकर्त्याला जपण्याचं काम समाजाने केले पाहिजे तसेच अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाने वेळोवेळी उभे राहिले पाहिजे…! या महान कार्याला महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल आणि भिम टायगर सेना या सामाजिक संघटनेचा कडक निळा भडक क्रांतिकारी जय भिम.

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक जनहित 24 न्यूज चॅनल, सहसंपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल, उपाध्यक्ष उमरखेड प्रेस क्लब तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड, कार्यकारी संपादक जनहित 24 न्यूज चॅनल, मो.9823995466



