
🪙 बौद्ध धम्मामध्ये वर्षावास प्रारंभ आणि समारोपाला फार जास्त महत्त्व आहे – सिध्दार्थ दिवेकर (शहर अध्यक्ष भीम टायगर सेना) 🪙
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 11 जुलै) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ / गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी 9 वाजता भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर लगेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण उषाताई इंगोले, शांताबाई दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

तर रात्री 9 वाजता विहारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन पाच व्यक्तीने पाच पाने सोनाली इंगोले, सिध्दार्थ दिवेकर, रेखा धबाले, बौद्धवी धबाले, प्रफुल दिवेकर यांच्या कडून वाचून आगळीवेगळी “वर्षावास प्रारंभ” केला.
यावेळी सिध्दार्थ दिवेकर यांनीवर्षावास म्हणजे काय? याबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वर्षावास म्हणजे काय पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे.

या काळात ध्यान-साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्म-प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.


आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय – बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत इ.स.पू. ५२७ प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात.बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे.

जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून हा वर्षावास अस्तित्वात आहे. तेव्हापासून बौद्ध धम्मामध्ये वर्षावास प्रारंभ व समारोप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे मार्गदर्शक सिध्दार्थ दिवेकर यांनी केले.

यावेळी उषाताई इंगोले अध्यक्षा रमा माता महिला मंडळ, भारती केंद्रेकर, यशोदा दिवेकर, यशोधरा धबाले , सुभद्राबाई पाईकराव, बेबाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, उज्वला धबाले, कांचन दिवेकर, विद्या इंगोले, सुनिता दिवेकर, बेबाबाई गवंदे, मधु दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, उषा लोणकर, शांताबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, संघमित्रा केंद्रेकर, प्रफुल दिवेकर तुषार पाईकराव, इत्यादी अनेक उपासक उपासिका तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



