
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 28 जुलै) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे निसर्गचित्र या विषयावर चित्रकला स्पर्धा स्व. श्रीराम भोजाजी सूर्यवंशी बहुउद्देशीय संस्था उमरखेड संस्थेमार्फत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत शाळेतील 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा घेण्याकरिता कृष्णा कदम सर, कोथळकर सर तसेच संस्थेचे सदस्य नानाराव खापरे तुकाराम पांचाळ यांनी सहकार्य केले.

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक समृद्धी संदीप वाघ, द्वितीय क्रमांक अनुश्री विश्वनाथ जाधव, तृतीय क्रमांक सानिका दशरथ पिसाळ, चतुर्थ क्रमांक अंजली भाऊराव सुरोशे, पाचवा क्रमांक खुशी दीपक कुबडे, सहावा क्रमांक आरती सुनील जाधव यांनी पटकावला. या विजयी विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रशस्तीपत्र तसेच बक्षीस प्रदान करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एन.देशमुख सर पर्यवेक्षक डी.पी.सुरते सर तसेच शिक्षक प्रतिनिधी तथा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किसन सूर्यवंशी सर उपस्थित होते.बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन आर जे शिंदे सर तर आभार आर डी शिंदे यांनी मानले.





