
🔴 (कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालमत्तेचं मोठं नुकसान)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक 03 ऑगस्ट) येथे सद् भावना नावाची कंपनी मागील आठ वर्षांपासून उमरखेड शहराच्या बाहेर महागाव रोड या ठिकाणी उजव्या बाजूला कार्यरत होती. त्यांचा कारभार वारंग ते महागाव या राज्य महामार्गावर नवीन रोडच्या कामासाठी कटिबद्ध कार्यरत होते.

मागील दोन दिवसांपूर्वी अचानक उदभवलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या वर्कशॉप कार्यरत असलेल्या ठिकाणी त्यांचे जे सगळ्या गोडाऊन असलेले गाड्यांचं शेड मुक्कामी ठिकाण असलेलं व त्यांचं कार्यालय असलेल्या ठिकाणी सुद्धा भर दिवसा काही अज्ञान इसमाने दरोडा टाकून कोट्यावधी रुपयाची मालमत्ता ही चोरी करून पसार झाले.

व त्या ठिकाणी उभी असलेली वाहने फोर व्हीलर अनेक वाहने जेसीपी सारखी वाहने लंपास केली आहे. व तिथे काही सेक्युरिटी गार्ड काम करत असताना त्याच्या सारख्या लोकांना काही अज्ञात इसमाने धमकावत त्यांना तिथून निघून जाण्यास जबरदस्ती करून बळजबरी केले असे सुद्धा ऐकण्यात आले आहे.

त्यामुळे तिथे काही कर्मचाऱ्यांचे जीव सुरक्षित राहावे. म्हणून या ठिकाणी कार्यरत असलेले सेक्युरिटी गार्ड भीतीपोटी निघून गेल्यामुळे व तिथे कोणीही नसल्यामुळे काही कंपनीच्याच फितूर कर्मचाऱ्यांमुळे तिथे होत असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कंपनीचे मालमत्तेचं मोठं नुकसान करण्याचं धाडस केलेलं दिसून आलं आहे.कंपनी कामाचे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालमत्तेचं मोठं नुकसान केलं आहे.

मालमत्ता चोरून नेऊन बाहेर त्या लोकांनी ते वाहन विकण्याचा प्रयत्न केले आहे. अशी इथे जमलेल्या लोकांचे चर्चेवरून प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आज सकाळपासून उमरखेड महागाव पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला उपस्थित होते.



