
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 30 सप्टेंबर) पोलीस स्टेशन उमरखेड हदिदतील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते कि, आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व लग्नाचे वराती, DJ मुक्त साजरे करावे,DJ वाद्यामुळे, हदयविकाराचा झाटका येणे, बहिरेपणा येणे, असे अनेक आजाराला समोरे जावे लागत आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात जेष्ठ नागरीक, लहान मुले, गर्भवती महिला यांचे आरोग्यावर विपरीत परीणाम होत असतांना दिसुन येत आहे,

तसेच DJ बाद्यावर आक्षेपार्ह गाणी वाजवून दोन जातीधमंत जातीयतेढ निर्माण होत आहे, सदर DJ वाद्यावर नाचणारे युवा पिढीमध्ये दारू, गांजा, आफू व्यसनाचे प्रमाण वाढत चाललेले असुन युवा पिढीचे भविष्य अंधारात आहे,
याबाबीकडे पालक वर्गानी लक्ष देणे गरजेचे आहे, हल्लीच सर्व पक्षीय व धामीक संघटना, व्यापारी असोसिएशन, व उमरखेड तालुक्यातील नागरीकांनी DJ वाद्यावर बंदी घालून काटेकोर अमलबजावणी करावी अशा अशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिलेले आहे,

उमरखेड शहरात सण-उत्सव दरम्यान DJ वाद्यातून आक्षेपार्ह गाणे, डॉयनलॉग लावल्याने दोन भिन्न जातीधर्मात जातीय तणाव निर्माण झाल्याचे घटना घडलेले आहेत तसेच पोलीस स्टेशनला यासंवधाने गुन्हे सुध्दा दाखल आहेत.

सन-२०२५ मध्ये यवतमाळ जिल्हयातील पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गणपती उत्सव दरम्यान DJ वाद्यावर चढून अश्लिल ईशारे, अश्लिल अंगविक्षेप, करणारे १८ ते २५ वयोगटातील १२ युवकांवर कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन सदर युवकांना भविष्यात शासकिय नोकरी लागलेस चारीत्र पडताळणीचे वेळी सदर गुन्हयांमुळे निल प्रमाणपत्र मिळणे अशक्य आहे, DJ मुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असुन येणारी पिढी युवापिढी गुन्हेगारी प्रवृतीकडे मोठयाप्रमाणात वळतांना दिसुन येत आहे.

DJ वाद्याचे आवाजामुळे जेष्ठ नागरीक, लहान मुलांचे आरोग्यास धोका असुन DJ वर आक्षेपार्ह गाणी वार्जावणे, DJ वर चढणे, धार्मीक स्थळाजवळ हेतुपुरस्पर विशिष्ट गाणी लावणे व त्याचे रिल्स बनवून ते सोशल मिडीयांवर प्रसारीत करणे व त्यावरून प्रतिक्रीया उमटून गंभीर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे,

त्यामुळे पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरखेड शहरात व परीसरात यापुढे DJ वाद्य वापरावर बंदी घालण्यात आली आहे, यापुढे कोणीही DJ बाद्य लावणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.






